OBC , SBC VJ आणी NT या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana सुरु करण्यास मा मंत्रिमंडळाने दि. 19.10.2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.
आणि आता या ११ मार्च २०२४ याबाबत नवीन GR जाहीर करण्यात आला , महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळ अंतर्गत हि योजना लागू होणार
Document list For Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.
भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी).
कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला. नसल्याबाबतचे शपथपत्र.
भाडयाने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारनामा/करारपत्र.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची पात्रता
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे ,अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला OBC , SBC VJ आणी NT या प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक
विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
विद्यार्थ्यांचा स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.
अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य
दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
कोणत्या जिल्हात किती रक्कम मिळणार ?
मुंबई, पुणे, तसेच इतर शहरांसाठी
भोजन भत्ता | 32,000 रुपये |
निवास भत्ता | 20,000 रुपये |
निर्वाह भत्ता | 8,000 रुपये |
एकूण लाभ | 60,000 रुपये |
महानगरपालिका क्षेत्रासाठी
भोजन भत्ता | 28,000 रुपये |
निवास भत्ता | 15,000 रुपये |
निर्वाह भत्ता | 8,000 रुपये |
एकूण लाभ | 51,000 रुपये |
जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी
भोजन भत्ता | 25,000 रुपये |
निवास भत्ता | 12,000 रुपये |
निर्वाह भत्ता | 6,000 रुपये |
एकूण लाभ | 43,000 रुपये |
या योजनेसाठी अर्ज कुठे करावा – या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज हा जवळच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय मध्ये करता येईल असे सांगण्यात आले , तर ऑनलाईन अर्ज बद्दल GR मध्ये स्पस्ट माहिती दिलेली नाही . त्याबद्दल काही अपडेट्स आले तर आम्ही लवकरच आपल्याला शेअर करू
नवीन GR डाउनलोड – Click Here