महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2024 – तुम्हाला माहिती असेल, महाजोती अंतर्गत दरवर्षी राज्यातील मागासवर्गीय भटक्या जाती, विमुक्त जमाती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET या परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत टॅब देण्यात येतात.
दरम्यान यावर्षी सुद्धा OBC / VJNT आणि SBC या जातीच्या विद्यार्थ्यांना MHT-CET/JEE/NEET- 2026 या बॅचमध्ये हे टॅब मोफत देण्यात येत आहेत. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत 6GB/Day इंटरनेट डाटा देखील देण्यात येतो. महत्वाचे म्हणजे 10 जुलै 2024 अर्जाची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- 10 वी ची मार्कशीट
- 11 वी सायन्स घेतल्याचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट)
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2024
नोटीफिकेशन ची PDF – Click Here
अर्ज करण्यासाठी – Apply Now
पहा कोणाला घेता येईल महाजोती योजनेचा लाभ
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा.
- जे विद्यार्थी 2024 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची मार्कशीट अर्जासोबत सबमिट करावी.
- विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत मिळालेली टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
- त्यानुसार 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांनाकरीता 70% किंवा या पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- तसेच विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमूद पत्या वरून ठरविले जाईल.
पहा कसे असणार आरक्षण –
अ. क्र | सामाजिक प्रवर्ग | टक्केवारी |
1 | इतर मागास वर्गीय (OBC) | 59% |
2 | निरधीसूचित जमाती – अ (VJ-A) | 10% |
3 | भटक्या जमाती – ब (NT-B) | 8% |
4 | भटक्या जमाती – क (NT-C) | 11% |
5 | भटक्या जमाती – ड (NT-D) | 6% |
6 | विशेष मागास वर्गीय (SBC) | 6% |
एकुण | 100% |
समांतर आरक्षण –
- प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
- दिव्यांगांकरिता 4% जागा आरक्षित आहे.
- अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
अर्ज करण्यासाठी नियम व अटी
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2024 आहे.
- पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकार याबाबतचे सर्वाधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महा ज्योती यांचे राहतील.
- अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ Mahajyoti Call Centre वर संपर्क करावा – संपर्क क्र. 0712-2870120/21 E mail ID : mahajyotijeeneet24@gmail.com
- दरम्यान 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची मार्कशीट, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला अर्थात बोनाफाईट सर्टिफिकेट व MHT-CET/JEE/NEET या परीक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.
मोफत टॅब मिळवण्यासाठी असा करा अर्ज
सर्वप्रथम महाजोतीच्या https://mahajyoti.org.in/en/home/ या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
आता Application for MHT-CET/JEE/NEET-2026 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे, त्यांनतर तुमचा अर्ज सबमिट होणार.