सारथी पुणे अंतर्गत – मराठा व कुणबी विद्याथ्यांना मोफत डिफेन्स ट्रेनींग

कोणत्या फोर्स साठी ट्रेनींग मिळणार – ARMY, NAVY, AIR FORCE, PARAMILITARY FORCES (INCLUDING CRPF, SRPF, BSF,
ITBP,CISF,SSB,NSG,CPF, SPF) & SIMILAR KIND OF DEFENCE SERVICES ENTRY LEVEL
EXAMINATIONS TRAINING PROGRAM 2024-25

पात्रता – १२ पास

वयाची अट – २० वर्षे पूर्ण ( कमाल मर्यादा त्या संबंधित परीक्षानुसार )

प्रशिक्षण कालावधी – ६ महिने

अर्जाची अंतिम तारीख – 31 डिसेंबर 2023

निवड प्रक्रिया कशी असेल –

1. सुरवातीला सारथी मार्फत सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल.

2. CET मध्ये उत्तीर्ण गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी व शारीरिक चाचणी घेण्यात येईल. तिन्ही बाबीमध्ये
पात्र ठरलेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणासाठी पात्र असेल.

ऑनलाईन अर्जाची लिंक –   Apply Online

सविस्तर जाहिरात PDF ( १ – Click Here

सविस्तर जाहिरात PDF ( २ )  Click Here

 

अर्जदारांसाठी महत्वाच्या सूचना :

1. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा. (सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले रहिवाशी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे)

2. अर्जदार मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील असावा. (सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे.)

3. अर्जदाराचे पालकाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापेक्षा अधिक नसावे. (शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबधित तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.)

4. उमेदवाराने सारथी व महाज्योती या संस्थेकडून तसेच इतर कोणत्याही शासकीय/निम शासकीय/स्वायत्त संस्थे कडून कोणत्याही योजनेद्वारे कोणत्याही प्रशिक्षणाकरिता लाभ घेतलेला नसावा.

5.या पूर्वी सारथी मार्फत कोणत्याही स्पर्धा परीक्षा करिता प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी या उपक्रमासाठी पात्र नाही.

6. पूर्ण वेळ /part time नोकरी करणारे विद्यार्थी या उपक्रमास पात्र नाही

नोटीस किंवा GR अपडेट
WRITTEN BY

नोटीस किंवा GR अपडेट

भविष्यात होणाऱ्या भरत्या आणि जॉब ची नोटीस /GR तुम्ही या पेज वर पाहू शकता