दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावीचा निकाल जाहीर केला जाणार. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार. अशी घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.
मात्र या टाईमला साइटवर लोड जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहतांना अडचणी येतात त्यामुळे आम्ही खाली काही वेबसाईट दिल्या आहेत ज्या वरती तुम्ही तुमचा निकाल सहज पाहू शकता.
‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल
- https://mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- https://results.targetpublications.org
कसा पाहाल निकाल ?
- सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटवर जा.
- नंतर होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आणि आईचे नाव टाका, नंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
- नंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी कशी आणि कधीपर्यंत करता येईल ?
ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याला प्राप्त झालेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल,
तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://verification.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करता येईल. तसेच गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना 28 मे ते 11 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.